रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हातून एका खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील रामनगर येथे 15 जुलै, 2023 रोजी रात्री वंचित बहुजन आघाडीच्या जालना जिल्हा महासचिवांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संतोष आढाव असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिवांची संतोष आढाव यांची हत्या त्यांच्या काका निवृत्ती आढाव आणि त्यांचे दोन जावई यांनी मिळून केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली..
संतोष आढाव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठेवला होता आणि आज दिनांक 16 जुलै 2023 रोजी त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले व त्यांच्यावर अंत्यसंस्कार रामनगर येथील त्यांच्या शेतात करण्यात आले आहे. अंत्यसंस्कार वेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले कि संतोष आढाव यांचा हात्येचा मास्टर माईंड कोण आहे याचा पोलिसांनी शोध घेऊन त्याच्यावर आठ दिवसाच्या आत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
अंत्यसंस्काराच्या वेळी जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी नेते, जनसमुदाय व वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

