अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. – 9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर16 जुलै:- सावनेर येथे शिवसेनाच्या युवासेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तालुका व शहर कार्यकारिणी मध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी रामटेक लोकसभा सहसंपर्क प्रमुख श्री. उत्तमभाऊ कापसे यांच्या प्रमुख उपस्तितीत तसेच युवासेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर, रक्षित भौतिक सावनेर विधानसभा प्रमुख युवासेना यांच्या उपस्थितीत सुनिल धोटे तालुकाप्रमुख सावनेर, कपिल पांडे सावनेर शहर प्रमुख, प्रफुल्ल नारनवरे सावनेर उपशहर प्रमुख ह्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांची नियुक्ती झाल्याबद्दल बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्यज ठाकरे यांचे आभार मानले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

