✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिंदी(वर्धा):- आज दि. 16 जुलै रोजी पोलिस स्टेशन सिंदी येथे डायल 112 क्रमांकावर मोबाईल क्रमांक 7030514001 यावरून अजय रामभाऊ लोंढेकर रा.वार्ड क्र 8 सिंदी यांनी कॉल करून पोलिस स्टेशन ला त्यांचे अंगणातील नागोबाचे मंदिर जवळ मटणाच्या पिशव्या व चिप्स चे पाकीट टाकले आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी माहिती दिल्या वरून पोलीस निरीक्षक वंदना सोनुने व स्टाफ तडका फडकी घटनास्थळवर गेले असता तेथे पाहणी केली त्यावेळी अशी कोणतीही परिस्थिती तेथे नव्हती.
सदर घटना स्थळाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना विचारपूस केली असता असा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे तेथील लोकांनी कळवले त्यावरून नमूद फोन करणाऱ्या अजय लोंढेकर यांनी पोलिसांना डायल 112 वर खोटी माहिती दिल्याचे आढळून आले. त्यामुळे लोकसेवकास खोटी माहिती दिली म्हणून त्यांचेवर सिंदी पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा क्र.220/2023 भादवी कलम 177 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, न्यायालयाची परवानगी घेऊन पोलिस पुढील तपास सुरु आहे.

