मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्याकरीता राज्य सरकार द्वारा घोषित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहर मध्ये होण्या करीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महीलांकृती समितीचा संघर्ष भर पावसातही सुरूच आहे.
हिंगणघाट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित धरने आंदोलना चा काल ४९ वां दिवस होता. मेडिकल कॉलेज करीता महिलांच्या कार्यक्रमात ठरल्याप्रमाणे दर रविवारी काही खास तऱ्हे चे आंदोलन करण्यात येते. ह्या आंदोलनाचे वैशिष्ट म्हणजे आंदोलनातून महिला सृजनशील पद्धतींनी शासन, प्रशासन व स्थानिक प्रतिनिधींना मेडिकल कॉलेज हिंगणघाट येथे व्हावे ह्यासाठी इशारा देतात.
हिंगणघाट शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ ४९ दिवस अगोदर धरने आंदोलन सुरू करण्यात आले होते. ज्यात महिला पाऊस, चिखल व आणखी आव्हाने स्वीकारुन आताही उस्फुर्तपणे लक्षवेधी आंदोलन पुढे रेटत आहेत.
ह्या आंदोलनात वेगवेगळे वळण आणि टप्पे आतापर्यंत पार पडले. त्यात काही अंशी महिलांच्या आंदोलना ला आशावादी यशही मिळाले, त्यामध्ये वर्धा आणि अमरावती चे ठिकाणाला तात्पुरती स्थगिती हे प्रमुख उपलब्धी आहे. त्यामुळेच अशा आशावादी आदोलांची धार कमी नको व्हायला; असे मत महिला कृती समितीच्या सीमा मेश्राम ह्यांनी ठेवले आणि आंदोलन पावसातही पुढे रेटायचे निश्चित केले.
काल ४९ व्यां दिवशी महिलांनी हातातील काळया बांगड्या घालून व त्या दर्शवून प्रशासन आणि स्थानिक लोक प्रतिनिधींना आपले सामर्थ्य दाखवावे आणि वैद्यकीय महविद्यालय हिंगणघाट मध्ये येण्यास उस्फुर्त कृती कराव्यात असा इशारा दिला. यामध्ये प्रामुख्याने सावित्रीच्या लेकी सामाजिक संस्था च्या अध्यक्षा सीमा मेश्राम, सिंधु दाखने, सुचिता कांबळे, निर्मला भोंगाडे, वंदना भगत, सिंधू दखणे, संध्या जगताप, शारदा जांभुळकर, सुष्मा पाटील, प्रीती चव्हाण, योजना वासेकर, नंदिनी मांडवे, अश्विनी निमसरकर, ताकसांडे ताई इ. ची उपस्थिति होती.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

