अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
8956647004
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आष्टी:- तालुक्यातील संघमित्रा बुद्धविहार समितीच्या वतीने भारसवाडा येथे स्थानिक बुद्ध विहारात दि 16 जुलै 2023 रोज रविवार ला विजय वामन थुल यांचा सेवानिवृत्ति निमित्त शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे ज्येष्ठ नेते मनोहर लांडगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी मनोहर लांडगे हे अध्यक्षस्थाना वरून बोलताना म्हणाले की, विजय थुल यांच्या संघर्षमय जीवनात विजय मिळविला, त्याचे भान समाजानं ठेवावे असे मत मांडले. तर प्रमुख अतिथी म्हणून येथील पोलिस पाटील विष्वभूषण दलाल यांनी त्यांना पुढील जीवनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महेंद्र चतुर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाला उज्ज्वालाताई शेंडे, साहेबराव शेंडे, सिद्धार्थ शेंडे, धर्मादास आटे, महेंद्र आटे, महेंद्र वानखेडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजनासाठी समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

