दशरथ गायकवाड, पुणे प्रतिनिधी
पुणे:- लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत माळीमळा. गायकवाड वस्ती, लोणी काळभोर, पुणे येथे बेकायदेशीर पणे पत्त्यांचा जुगार खेळत व खेळवत असलेबाबत पोलीस अंमलदार ज्यांना त्यांचे गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली होती.
सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवून छापा टाकला असता सदर ठिकाणी काही इसम बेकायदेशीर पणे ५२ पत्त्यांचा रमी हा जुगार पैशांवर खेळत असल्याचे दिसल्याने जुगार घेणारे व जुगार खेळणारे 10 इसम मिळुन आले.
1) लक्ष्मण संभाजी जगताप वय 60 वर्षे, रा. माळीमळा. अहिल्यादेवी शाळेजवळ, लोणी काळभोर पुणे, 2) मंगेश कुंडलिक शिंदे वय 27 वर्षे, रा. मलमाळा, लोणी काळभरे पुणे, 3) मल्हारी पोपट शिंदे वय 26 वर्षे रा. सातववाडी, हडपसर पुणे 4) सचिन उत्तम मालपानी वय 35 वर्षे रा. लोणीगांव, ननवरे चाळ, लोणी काळभोर पुणे 5) राहुल बाबासाहेब गायकवाड वय 40 वर्षे रा. एम.पी. कोलवाडी ता. हवेली जी. पुणे 6) शकील अहमद शेख वय 35 वर्ष लोणी स्टेशन, लोणी काळभोर पुणे 7) अन्सार अली झिया उद्दीन कोरबू वय 45 वर्षे, लोणी स्टेशन, लोणी काळभोर पुणे 8) अक्षय बिरम यलगुंडे वयाच्या 33 व्या वर्षी. टेलिफोन ऍक्सेस कॉउचर्स, लोणी काभोर पुणे 9. संदीप रामचंद्र लांडगे वय 32 वर्षे रा. घोरपडेगाव पुणे 10) परमेश्वर गोविंद कुसाळकर वय ४२ वर्षे रा. माळीमळा लोणी पुणे
त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यात रोख रक्कम 10,400 रू. घटनास्थळावरून जप्त केले. सदर प्रकरणी नमुद 10 इसमांविरुध्द लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुरनं 445/2022 महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम 12 (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, पोलीस सहआयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे श्रीनिवास घाडगे पोलीस उप आयुक्त गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच पोउपनि श्रीधर खडके, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, प्रमोद मोहिते, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.