पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
अपहृत मुलीसह तरुणाचा शोध सुरू :-
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे : कामानिमित्त नातेवाईकांकडे आलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीला पळवून नेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली.
बाबूराव उर्फ दत्ता बालाजी मेकाले (वय २२, रा. थेरगाव, मूळ रा. कासारबालकुंदा, ता. निलंगा, जि. लातूर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूराव मेकाले हा कामाच्या शोधात त्याच्या गावाकडून शहरात आला. थेरगाव येथील त्याच्या नातेवाईकांकडे तो राहण्यास होता. दरम्यान, १७ नोव्हेंबर २०२२ रोजी थेरगाव येथील १५ वर्षीय मुलीला त्याने फूस लावून पळवून नेले.
संपर्कासाठी खालील नंबरवर संपर्क करावा.
१) वाकड पोलीस ठाणे. पिं.चिं. मो.नं. ९८९०८७२८२२. फोन नं. ०२० २२७२६११२० / ०२०२२७२६११३०
२) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे, पिं.चिं. मो.नं. ९५५२२३४५९९.
३) सपोनि. एस. एस. जाधव तपासी अधिकारी मो.नं. ९६५३३०६१५६

