अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं.-9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर -17 जुलै:- नागपूर पीएसीएल ऑफिस मधील कर्मचारी संजय जुनघरे यांनी महत्वाचे कागदपत्रे गहाळ केल्या प्रकरणी पीडित ग्राहकांनी धंतोली पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन देण्यात आले. संजय जुनघरे नागपूर हा पीएसीएल ऑफिस मध्ये सिनी. कर्मचारी नंतर असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत होता.
2014 मध्ये सेबीच्या आदेशानुसार देशभऱ्यातील संपूर्ण ब्रँचेसला सील लागले व कागदपत्रे सेबी कडे देण्यात आली असे सांगण्यात आले. ग्राहकांनी संजय जुनघरे ला ऑफिसमध्ये आमचे ओरिजनल पॉलिसी बॉण्ड आहे ते आम्हाला परत करा तेव्हा ते म्हणाले माझ्याकडे चावी नाही. म्हणून टाळाटाळ करत होता.
2014 पासून तर 16 जुलै 2023 पर्यंत त्यांनी स्वतः चाबीने ऑफिस उघडून महत्त्वाची कागदपत्रे गहाळ केली व त्याच दिवशी मोठी गाडी भरून ग्राहकांच्या स्लिप0ओरिजनल पॉलिसी बॉण्ड रद्दीत विकण्याकरता नेत असताना रंगेहात पकडले. हे ग्राहकांच्या असे लक्षात आले की त्याचे कनेक्शन आज पण पीएसीएल हेड ऑफिस सोबत आहे.
काही पीडित ग्राहकांनी पल्स ऑफिस ची पाहणी केल्यानंतर हे लक्षात आले की तेथील फॅन, ए.सी. संगणक, खुर्च्या, टेबल, फ्लॉपी, डिश, फ्रीझ, वायरिंग, पेन, पेन्सिल व ईतर महत्त्वाचे सामान चोरी करून विकल्याचे निदर्शनास आले.
2014 पासून पीएसीएल कंपनी बंद झाली. तेव्हापासून सेबी, सुप्रीम कोर्ट व लोढा कमिटी च्या माध्यमातून हाताळणी सुरु आहे. असे निदर्शनास येत आहे की आम्हा सर्व ग्राहकांची फसवणूक व घात झाला आहे. ओरिजनल दस्तावेज सेबी पर्यंत पोहोचलेच नाही तर ग्राहकांना पैसा कसा मिळेल असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.सर्व ग्राहकांच्या मानसिकतेला खूप मोठा हादरा बसला आहे.संजय जुनघरे यांनी ऑफिस मधील लाखो रुपयाची मालमत्ता चोरलेली असून वरिष्ठांच्या आशीर्वाद मुळेच हे कार्य होत असल्याचे निदर्शनास आले.
संजय जुनघरे च्या अशा कृत्यामुळे आम्ही सर्व पीडित ग्राहक,अर्जदारांना आर्थिक,मानसिक व शारीरिक त्रास झालेला आहे.त्यामुळे संजय जुनघरे यास अटक करण्यात यावी या आशयाचे निवेदन मा.पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन धंतोली नागपूर येथे शेकडो पीडित ग्राहकांच्या वतीने देण्यात आले.
निवेदन देतेवेळी मा.किशोर बुचे साहेब,सतीश कामडी,राम वाघ,प्रवीण आदमने,प्रवीण देशमुख,महेश बिजोडे,अनिल अडकिने,अरविंद भोयर,खालिल शेख,महंत साहेब, ठाकूर साहेब व इतर पीडित ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

