हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर दि: 17 जुलै:- रोज सोमवारला जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे दुपारी: 3.30 वाजता पालक शिक्षक सभा घेण्यात येऊन पालक शिक्षक संघ गठीत करण्यात आला. प्रथमता: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. भगत सर होते.
त्यानंतर कार्यकारणी सत्र: 2023- 24 चे गठन करण्यात आले. ती याप्रमाणे, 1) श्री. बी. बी. भगत (मुख्याध्यापक)- अध्यक्ष, 2) सौ. सारिका दिनेश शेंडे (पालक प्रतिनिधी)- उपाध्यक्ष, 3) श्री. आर. बी. अलाम (शिक्षक प्रतिनिधी)- सचिव, 4) सौ. सरीता शालिक आत्राम (पालक प्रतिनिधी)- सहसचिव, 5) सौ. एस. एन. लोधे (शिक्षक प्रतिनिधी)- सहसचिव, 6) कु. रक्षा सुनील ठाकरे (विद्यार्थी प्रतिनिधी) तसेच प्रत्येक वर्गातील एक शिक्षक व एक विद्यार्थी सदस्य असतील.
मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाबकळी देऊन स्वागत करण्यात आले. पालक शिक्षक सभेत सौ. आम्रपाली वेले, सौ. प्रियंका रामटेके यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यांचे निराकरण सभाध्यक्ष यांनी केले. यावेळी सौ. सारिका शेंडे उपाध्यक्ष यांनी सांगितले की, शिक्षकांनी चांगले अध्यापन करून विद्यार्थी घडणीत हातभार लावला पाहिजे. श्री. रांगणकर सर यांनी सांगितले की, पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे.
यावेळी अध्यक्षीय भाषण करताना श्री. भगत सर (मुख्याध्यापक) यांनी सांगितले की, आपल्या शाळेत आर्थिक दृष्ट्या कमजोर विद्यार्थी शिकतो आहे. शिक्षण मोफत आहे. पहिली ते आठवी नापास करायचे नाही असा आदेश आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना जागरूक राहून आकार देत असतो, आपला पाल्य घडला पाहिजे याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आर. के. वानखेडे, संचालन श्री. आर. बी. अलाम आभार श्री. संतोष चव्हाण यांनी केले. पालक शिक्षक सभेत शिक्षक श्री. एम. डी. टोंगे, शिक्षकेतर कर्मचारी श्री. जगदीश कांबळे, श्री. वाल्मीक खोंडे, श्री. वामनराव बोबडे पालक वर्गातून सौ. मायाबाई कस्तुरे, सौ. मंजू गवई, सौ. लक्ष्मी उईके, सौ. संगीता आत्राम, सौ. शुभांगी दुर्गे, सौ. सुकेशनी निमकर, सौ. आम्रपाली वेले, सौ. प्रियंका रामटेके, सौ उमा केशकर, सौ. सपना वेले तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

