हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- भारतीय बौद्ध महासभा तालुका राजुरा,शहर,ग्राम शाखा तर्फे चलो बुध्द की ओर या योजने अंतर्गत वर्षावास प्रवचन मालिकांचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह तक्षशिला नगर बामणवाडा, मा.ज्यो.फुले सार्वजनिक पंचशील मंडळ धोपटाला कॉलनी, तक्षशिला बुध्द विहार गोवरी, सुविकास बुध्द विहार गोयेगाव,सम्यक बुध्द विहार सोमनाथपूर वॉर्ड राजुरा, ” येथे भारतीय बोैद्ध महासभा, तालुक्याचा वतीने 2022 नंतर 2023 मध्ये “वर्षावास धम्मप्रवचन ” मालिकाकेला सुरवात करण्यात आली.
वर्षावास धम्मप्रवचन ही मालिका आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा पर्यंत राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आयु.किशोरभाऊ तेलतुंबडे केंद्रीय शिक्षिक,चंद्रपूर आयु.नी.कविताताई अलोने, केंद्रीय शिक्षिका चंद्रपूर आयु.धर्मुजी नगराळे अध्यक्ष राजुरा यांचा हस्ते तथागत गौतम बुध्द व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रजलन करण्यात आले. नंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. या “वर्षावास धम्म प्रवचन व गुरुपौर्णिमा “या विषयावर अतिशय सुंदर सविस्तर पणे मार्गदर्शन आयु. किशोरभाऊ तेलतुंबडे केंद्रीय शिक्षिक, आयु.नी कविताताई अलोने केंद्रीय शिक्षिका.आयु.धर्मुजी नगराळे अध्यक्ष प्रत्येकानी मार्गदर्शन केले.
राजुरा तालुक्यामध्ये राजुरा, बामणवाडा,गोवरी, धोपटाला कॉलनी, गोयेगावं येथील सर्व पदाधिकारी बौद्ध उपासक व उपासीका उपस्थित होते.या ठिकाणी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे उद््घाटन आद.धर्मुजी नगराळे बामणवाडा, धोपटला कॉलनी आणि गोवरी, गोयेगावं प्रा.दिनेश घागरगुडे यांचे हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमात संचालन आयु.गौतम चौरे, तर आभार प्रदर्शन आयु.सर्वानंद वाघमारे माजी सरपंच यांनी केले.
शेवटी सरणत्य घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

