मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:– तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. महेश ज्ञानपीठ कॉलेज हिंगणघाट येथे शिक्षण घेणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. वेदिका हेमंत कडू असे मयत विद्यार्थिनींचे नाव आहे.
हिंगणघाट तालुक्यातील गांगापुर येथील रहिवाशी वेदिका हेमंत कडू वय १४ वर्षाची ही महेश ज्ञानपीठ कॉलेज हिंगणघाट येथे शिक्षण घेत होती. अचानक घरी तब्बेत खराब झाल्याने तिला यवतमाळ येथे रुग्णालयात उपचारा करीता नेण्यात आले व तिथे तिची प्राणज्योत मावळली. ही बातमी गावात कळताच शोककळा पसरली आहे. असे अचानक वेदिका कडू हीच्या जाण्याने कडू परिवार दुखः च डोंगर कोसळले आहे.
दिनांक 18 जुलै रोजी सायंकाळी तिच्या राहत्या गावी गांगापुर येथे 4 वाजता अंतिमसंस्कार करण्यासाठी तिचा मृतदेह आणण्यात आला. पण मुसळधार पावसाने आगमन झाले, रात्रभर वेदिकाचा मृतदेह घरी ठेवला, 19 सकाळी पाऊस उघडताच गांगापूर येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी अंतिम निरोप दिला.

