🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी 🖊️
वर्धा:- तालुक्यातील सिंदी मेघे येथून एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. सिंदी मेघे परिसर असलेल्या बहुजन नगर येथे कचऱ्याच्या धिगाऱ्यात एक स्त्री जातीने मृत अर्भक आढळून आले. हे मृत अर्भक स्थानिक रहवासाना दिसून आले होते. त्यांनी याबाबत पोलिसाना माहिती दिली.
पोलिसांना माहिती प्राप्त होतात रामनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि या प्रकरणी तपास सुरू केला. हे मृत अर्भक सहा ते सात महिन्याचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी या अर्भकाला ताब्यात घेत अज्ञात महिलेविरुद्ध विविध कलमन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सिंदी मेघेच्या बहुजन नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या विजय उमरे यांच्या घराशेजारी असलेल्या रिकाम्या भूखंडातील कचऱ्यात हा अर्भक सकाळी नजरेस पडला. कचऱ्यात अर्भक दिसताच परिसरातील नागरिकांनी याची माहिती रामनगर पोलिसांना दिली. कोणीतरी अज्ञात स्त्री ने स्वतःच्या पोटातील गर्भाचा गर्भपात करून जन्मलेल्या स्त्री जातीच्या मृत अर्भकाची स्वतः किंवा इतर दुसऱ्याच्या मदतीने अर्भकास कचऱ्यात फेकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे.या प्रकरणी रामनगर पोलिसांनी विविध कलमनव्ये अज्ञात स्त्री विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी अर्भकाला ताब्यात घेत वर्धेच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. हा अर्भक कोणाचा असून कोणी फेकला याबाबत रामनगर पोलीस तपास करत आहे.