युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील सावनेर येथील जनतेला आरोग्य सेवेसाठी अद्यापही झगडावे लागत आहे. सर्व गोर गरीब नागरिकांना आरोग्य सेवा सक्षमपणे पोहचवण्यासाठी कोट्यवधींचा निधी शासन खर्च करत असले तरी वास्तवतेत मात्र या सावनेर येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र उपचार केंद्र येथील आरोग्य अवस्था फारशी चांगली नाही. आरोग्य केंद्राबाबत अनेक तक्रारी वारंवार येत असतांनाही त्याकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नाही.
या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे व सोयी सुविधांचा अभाव असल्याने रुग्णसेवा खिळखिळी झाली आहे. रुग्णांना नागपुर येथील रुग्णालयात रेफर केले जात असते. राज्य शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गरीब व वंचित लोकांना आरोग्यसेवेचा लाभ घेता येत नाही. कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. आरोग्य विभागाने ग्रामीण रुग्णालयाच्या सोयी सुविधेकडे दुर्लक्ष केले आहे. लोकप्रतिनिधीच्या उदासीन धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ घेता येत नाही. येथील वैद्यकीय सेवा ऑक्सिजनवर असल्याने लोकांच्या जीवनाशी खेळखंडोबा करण्यात शासकीय अधिकारी मश्गुल असल्याचे दिसून येत आहे.
त्यात ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र उपचार केंद्र येथे रुग्ण उपचार घेण्याकरिता येतात परंतु येथे नागरिकाना उपचारासाठी रुग्णाची व्यवस्था व उपचार बराबर होत नसल्याचे रुग्णाची माहिती आहे स्वास्थ्य विभाग कडे रुग्ण जातात व त्यांना कोणत्याही प्रकारचे औषध न देता बाहेरून बोलवण्याचा प्रयत्न करतात व ते रुग्णांना नागपूर येथे रेफर करतात तसेच त्यांना आरोग्य विभागाचे ॲम्बुलन्स सुद्धा उपलब्ध राहत नसल्याने बाहेरून ॲम्बुलन्स प्रायव्हेट गाड्या करून रुग्णांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यांना येथे कोणतेही प्रकारचे नागरिकांना सोय नाही असे स्वास्थ विभागाचे अधिक कर्मचारी सांगतात व गरिबांना तात्काळ नागपूर येथे रेफर करतात आणि उपचार करणे करिता आपल्या आलेल्या मर्जी यांना भरती सुद्धा करीत नाही त्यांना नाही लाजास्त त्यांची हकालपट्टी करतात येथील स्वास्थ अधिकारी यांची मनमानी कारभार चालू आहे तसेच येथील अधिकारी यांना रुग्णालयाचे नावे नागपूर रेफर करणे करिता येतील ॲम्बुलन्स कधीच उपलब्ध राहत नाही आणि पेशंट सुद्धा वाट पाहत बसतात ॲम्बुलन्सची वाट बघत असताना ॲम्बुलन्स उपलब्ध राहत नसल्याचे येथील अधिकारी सांगतात त्याचप्रमाणे आपण प्रायव्हेट गाडी करून आपले पेशंट घेऊन जा असे अनेक उदाहरण शहरांमध्ये समोर आले आहेत.
सावनेर शहरांमध्ये व तालुक्यामध्ये तीन ते चार लाख लोकांची संख्या आहे आपला शासकीय दवाखाना मेन स्टॉप नसून तेथे अनेकदा दुर्घटनेच्या केसेस येतात पण तिथे कोणतेही उपचार होत नाही याप्रसंगी लोकांचे जीव गमावा लागतात येथील स्वास्थ अधिकारी आपले स्वतःचे रुग्णालय उघडून मजा मारत आहे व स्वास्थ विभागाचे अधिकारी मोठ्या प्रमाणात राजकारण खेळत आहे या राजकारणी कर्मचाऱ्यामुळे नागरिकांचे स्वास्थ धोक्यात आले आहे या सरकारी कर्मचाऱ्यांमुळे येथील आरोग्यवस्था प्रायव्हेट दवाखाने आहे यामुळे नागरिक कर्जबाजारी होऊन प्रायव्हेट मध्ये प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये लूट होत आहे व त्यांना वैद्य यांचा पाठिंबा आहे म्हणून या आरोग्य केंद्र प्रशिक्षण केंद्राने केंद्राचे अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावेत्यांच्या जागेवर नवीन कर्मचारी नियुक्त करावी अशी मागणी सावनेर शहरचे शिवसेना शहर अध्यक्ष सुभाष मसले, दिनेश इंगोले, जय शिवाजी सामाजिक संस्था मयूर नागदवणे, आयुब खान, किशोर चनेलिया, नरेंद्र पारवे, गणपती पठाने, पठाणे चंदुलाल पुरे, तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

