भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर पोलिसाची कारवाई
दशरथ गायकवाड पुणे प्रतिनिधी
पुणे:- मागील 8 महिन्यापासून खुनाचा प्रयत्न करण्याचा आरोपी फरार होता. त्याचा सर्विकडे शोध सुरू होता. पण तो मिळत नव्हता. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील पाहीजे फरारी आरोपींचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणेबाबत वरीष्ठांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी धिरज गुप्ता व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले होते.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी धिरज गुप्ता व पोलीस अंमलदार हे पाहीजे फरारी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे व सचिन गाडे यांना त्यांचे बातमी दारामार्फेत बातमी मिळाली की, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर 25/2022, भादंवि कलम 307, 34 या गुन्हयामध्ये मागील ८ महीन्यापासुन फरार असलेला आरोपी किरण दिलीप मोरे, वय 24 वर्षे, धंदा नोकरी, रा. बी. बिल्डींग मजला मदारी वस्तीच्या बाजुला गल्ली नंबर 5. शेवटी, कोरेगाव पार्क, पुणे हा त्याचे राहते घरी आईला भेटण्यासाठी आला आहे. लागलीच तपास पथकाचे अधिकारी धिरज गुप्ता व पोलीस अंमलदार नरेंद्र महांगरे, धनाजी धोत्रे, राचिन गाडे, हर्षल शिंदे, राहुल तांबे, अभिजीत जाधव यांनी आरोपीचे वर नमुद राहते घरी जावुन त्यास ताब्यात घेवुन नमुद गुन्हयामध्ये अटक केली आहे.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, श्री राजेंद्र डहाळे मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्री सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, श्रीमती सुषमा चव्हाण पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील श्री जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व संगीता यादव, विजय पुराणिक, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार नरेंद्र महांगरे, हर्षल शिंदे, अभिजीत जाघव, धनाजी धोत्रे, राहुल तांबे, सचिन गाडे, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले यांच्या पथकाने केली आहे.