नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी मोबा.न.9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई: दिनांक 20 जुलै 2023 रोजी मिरा भाईंदर महानगर पालिका कार्यक्षेत्रात भाईंदर (पूर्व) “नवकिर्ती प्रिमायसेस” या इमारतीचा भाग कोसळल्याची दुर्घटना सकाळी 10:30 च्या सुमारे घडली. सदर दुर्घटनेत 4 पादचारी जखमी झाले असून एक पादचारी मृत्युमुखी पडला आहे. मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा दिलीप ढोले यांना सदर दुर्घटनेची माहिती होताच आयुक्त यांच्या निर्देशानुसार अग्निशमन दलाची 3 वाहने, एक रेस्क्यू व्हॅन, अग्निशमन अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत 54 जवान, ॲम्बुलन्स व वैद्यकीय विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्यासाठी कार्यरत होते.
मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील 24 तासात मिरा भाईंदर शहरात 250 मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. दिनांक 20 जुलै 2023 रोजी भाईंदर पूर्वेकडील “नवकिर्ती प्रिमायसेस” या इमारतीचा भाग कोसळल्याची दुर्घटना सकाळी 10:30 च्या सुमारे घडली. सदर इमारत ही या घटनेपूर्वीच धोकादायक घोषित करून रिकामी करण्यात आली होती व या इमारतीत रहिवासी नव्हते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. दुर्घटनेची माहिती होताच आयुक्त यांनी सदर दुर्घटनास्थळी तात्काळ भेट देऊन बचाव कार्यासाठी आणखी मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचे निर्देश दिले. दुर्घटनेत एकूण 4 पादचारी जखमी झाले असून एका पादचारीचा इमारतीचा भाग कोसळून मृत्यु झाला आहे. दुर्घटनेत अडकलेल्या एकूण 4 पादचारींना बचावकार्यात बाहेर काढण्यात आले असून बचाव कार्यानंतर मातीच्या ढिगाऱ्यात एक व्यक्ती मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले. मृत्युमुखी व्यक्तीचे नाव दुर्गा अवधेश राम अंदाजे 45 असे असून ही व्यक्ती रेल्वे स्थानकावर बूट पॉलिश करणारा असल्याची ओळख रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिली आहे. इंद्रजित शर्मा (48), जॉर्ज फर्नांडिस (55), हरिशंकर मौर्य (55), अबिद अली (22) असे 4 जखमींना व दुर्गा राम (अंदाजे 45) या मृतदेहाचे शव परीक्षण करण्याकरिता तातडीने पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार सदर इमारत ही निष्कासित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

