अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:-कवयित्री प्रा. मालती चांदूरकर लिखित मी वेचलेले चार क्षण आणि माऊलीचे अंतरंग या काव्य संग्रहाचे नुकतेच प्रकाशन सोहळा आणि सौ. मालती चांदूरकर व प्रा. पंजाबराव चांदूरकर यांचा विवाहबंधनाचा सुवर्ण महोत्सव महेश भवन साईनगर अमरावती येथे नुकताच पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. धनंजय वर्मा उपाख्य महंत वैद्यराज यक्षदेव, महानुभव हे होते. तर अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री सुधाकरराव गनगणे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून प्रसिध्द गायिका प्रा.डॉ कमलाताई भोंडे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रजिया सुलताना या होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदिका क्षिप्रा मानकर यांनी केले. या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करून पुष्पगुच्छ देऊन चांदूरकर कुटुंबाचे अभिनंदन केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

