मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सत्ताधारी नेते हिंगणघाट शहराचा विकासाच्या किती ही गोड बाता मारत असेल तरी जमिनीवर विकास दिसून येत नाही. फक्त विकासाच्या नावावर पैश्याची झोळी भरण्याचे काम या नेत्यांनी केले काय अशा चर्चेला वाव मिळत आहे. जेव्हा शहरातील अनेक वार्डातील रस्त्ये गड्डेमय आणि चिखलमय असेल तर या कार्यसम्राट नेत्यांनी विकास केला तरी कुठे हा प्रश्न उपस्थित होतो.
हिंगणघाट शहरातील अनेक वार्डात रस्त्ये चिखलमय आणि गड्डेमय झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. मग स्थानिक नगरसेवकांनी 5 वर्ष काय केलं हे नसमजलेल कोड आहे. त्यामुळे अनेक वार्डातील नागरिक हिंगणघाट नगर पालिकेच्या विरोधात आक्रमक झाले आहे.
बंटी वाघमारेसह नागरिक करणार आंदोलन: कमलेश उर्फ बंटी वाघमारे यांनी संत ज्ञानेश्वर वॉर्डातील व माता मंदिर वॉर्डातील रस्त्यांची झालेली दुरवस्था सुधाण्यासाठी नगरपरिषद कार्यालय हिंगणघाट ला गेल्या 2 महिन्यापासून वारंवार निवेदने दिले व वेळोवेळी पाठपुरावा केला तरीही निद्रसिन अवस्थेत असलेले नगरपरिषद प्रशासन जागे व्हायचे नाव नाही घेत आहे. हे नागरिकांच्या व त्यांच्या लक्षात आले असून पावसाळ्यातल्या पाण्यामुळे वॉर्डातील नागरिकांचे पायदळ चालणे अवघड झाले असून सर्व रस्त्यावर चिखल साचलेला आहे. अश्या परिस्थितीत जर एखाद्या रुग्ण व्यक्तीला दवाखान्यात न्यायचे म्हणजे तारेवरची कसरत करणेच आहे. या रस्त्यावरून दररोज कोणी ना कोणी बाईक घेऊन पडून छोटेमोठे अपघात होणे आता नवीन राहिले नाही आहे. शाळकरी विद्यार्थांना सुद्धा याचा नाहक त्रास भोगावा लागत आहे.
या सर्व बाबी नगर परिषद प्रशासनाला वारंवार दाखवून सुद्धा तात्पुरती मलमपट्टी म्हणून त्यावर साधा मुरूम टाकायची तसदी सुद्धा प्रशासनाने घेतली नाही. म्हणून नगर परिषद प्रशासनाने जर येत्या 25 जुलै पर्यंत खड्डे बुजवून रस्ते दुरस्ती केली नाही तर प्रशासनाच्या या हलगर्जीपणाचा निषेध म्हणून बंटी वाघमारे यांच्यासह वॉर्डातील नागरिक खड्ड्यात बसून आंदोलन करतील असा इशारा संत ज्ञानेश्वर वॉर्डातील नागरिकांनी व बंटी वाघमारे यांनी नगरपालिका हिंगणघाट यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

