✍🏻 विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
वाळकी:- अहमदनगर मधून एक खळबजनक बातमी समोर येत आहे घोसपुरी शिवारात स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटणार्या टोळीतील फरार दरोडेखोर अजय गजानन काळे यास नगर तालुका पोलिसांच्या पथकाने बुरुडगाव शिवारातील म्हात्रे मळा परिसरात शुक्रवारी (दि.26) रात्री सापळा लावून पकडले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल जप्त केली आहे. घोसपुरी शिवारात दि.20 जुलै 2021 रोजी चंद्रपूर येथील मिलिंद कान्हाजी काशिदे व त्याचा भाऊ यांना स्वस्तात सोन्याच्या आमिषाने बोलावून, त्यांच्या जवळील 8 लाख 34 हजारांचा ऐवज लुटला होता.
याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर या टोळीतील 7 जणांना पोलिसांनी पकडले होते. मात्र, सराईत दरोडेखोर असलेला अजय काळे हा फरार होता. शुक्रवारी (दि.26) रात्री तो बुरुडगाव शिवारातील म्हात्रे मळा परिसरात आल्याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह सापळा लावून त्यास शिताफीने पकडले. त्याला शनिवारी (दि.27) न्यायालयात हजर केले असता, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.