रविंद्र भदर्गे, उपजिल्हा जालना प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- शेतकरी मोठ्या मेहनतीने आपल्या विहिरीवर विजपंप बसवतो आणि आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी तयार असतो परंतु वीज पंप चोरीला गेले की पिकाला पाणी देणे बंद होते आणि नवीन पंप विकत घेणे म्हणजे पुन्हा विनाकारण पैसे खर्च, अशा परिस्थितीत परतूर शहरातील तसेच रायपूर, आनंदवाडी, जुना मोंढा परिसरातून काही शेतकरी यांच्या मोटारी वीज पंप चोरीस गेले होते, त्याबाबत त्यानी पोलिस स्टेशन येथे चोरीची तक्रार दिली होती त्या प्रमाणे विविध गुन्हे नोंद करण्यात आले होते. त्यांच्या तपासा दरम्यान आज रोजी परतूर पोलिस यांना गोपनीय माहिती मिळाली त्या वरून आरोपी नामे गणेश आसाराम ढवळे, सुनील आसाराम माने, दिलीप विठ्ठल बिडवे सर्व रा. साईनगर परतूर. यांना ताब्यात घेतले असता वरीप्रमाणे वीज पंप चोरून नेले बाबत सांगून ६ वीजपंप किंमत ५८,८०० रूपयाचा मुद्देमाल समक्ष काढून दिला असून एका गुन्ह्यातील लोखंडी अँगल सुद्धा चोरल्याची कबुली दिली आहे. आरोपी विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई तुषार दोशी, पोलीस अधीक्षक जालना, डॉ. राहुल खाडे अपर पोलीस अधीक्षक जालना, बुधवंत उपविभागीय पोलिस अधिकारी परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे, पोउपनि अंभोरे, पोह/धर्मा शिंदे, पो ना/ अशोक गाढवे, पोका / दीपक आडे, पोका/अमोल मोरे, पोका/ गजानन राठोड, पोका/ दशरथ गोपनवाड, पोका/ गोविंद पवार, पोका/ सतीश जाधव चालक पोका/ राहुल आडे, विष्णु धोत्रे, विजय जाधव यांनी केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

