अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी मो नं – 9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- जवाहर कन्या विद्यालय सावनेर येथील सहाय्यक शिक्षिका सौ.कमल रमेश खंडाईतकर (निंबाळकर) यांचा सत्कार विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. विजयजी डहाके, सचिव नरेंद्रजी डहाके, उपाध्यक्ष मदनजी डहाके यांच्या हस्ते स्वर्गीय दामोधर डहाके सभागृह येथे करण्यात आला.
शिक्षिका सौ.कमल रमेश खंडाईतकर (निंबाळकर) यांनी शैक्षणिक काळात उत्कृष्ट सेवाकार्य केल्या बद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत स्वागत गीताने करण्यात आले. याप्रसंगी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन सौ. सुनंदा डहाके मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. विना मोहितकर यांनी मानले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

