अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सर्वोउपचार रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात मेडिसिन, सर्जरी, गायनीक, (ओबिजीवाय), ऑर्थोपॅडीक, ईएनटी, सायको, स्कीन, पॅथोलॉजी, बालरोग, दंत, नेत्र आदी विभाग आहेत. या विभागावर एका तज्ञ डॉक्टर विभागप्रमुखाची (एचओडी) नेमणूक केली आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 अशी बाहेरून विभागाची वेळ आहे परंतु अपवाद वगळता काही विभाग प्रमुख (एचओडी) नियोजित वेळेत विभागात सापडत नाही. प्रत्येक विभागात शिकाऊ डॉक्टर कडूनच रुग्णाची तपासणी केली जात असल्याचे चित्र आहे.
अकोला येथील सर्वोच्च रुग्णालयाच्या डॉक्टर तसेच बाह्य रुग्ण विभाग प्रमुखाचे (एचओडी) व डॉक्टरांचे अपवाद वगळता स्वतःचे दवाखाने आहेत. याबाबतीत उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठता डॉक्टर मीनाक्षी गजभिये मॅडम यांना काही दिवसाअगोदर निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. वरिष्ठांचे दुर्लक्ष असल्यामुळे विभाग प्रमुख संबंधित वार्डा तील डॉक्टर परिचारिका वेळेवर येत नाही, परंतु काही (एचओडी) विभाग प्रमुख प्रामाणिकपणे आपली सेवा देत आहे. या लेट येणाऱ्या विभाग प्रमुख डॉक्टरांमुळे रुग्णांना तासनतास ताटकळत बसावे लागते किंवा अनेकदा विना तपासणे परतावे लागत आहे. संबंधित विभाग प्रमुख डॉक्टर परिचारिका यांच्या बद्दल बऱ्याच रुग्णांनी वरिष्ठांकडे मौखिक तक्रारी केल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने ही तशा प्रकारच्या तक्रारी केल्या आहेत. परंतु अद्याप पर्यंत चौकशी व्यतिरिक्त कुठलेही कारवाई झाली नाही. म्हणून अशा लेट लतीफ येणाऱ्या विभाग प्रमुख (एच.ओ.डी) डॉक्टर परिचारिका यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठता डॉक्टर मीनाक्षी गजभिये मॅडम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

