पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा ,पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा ,पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार असे आज दि.२२/०७/२०२३ रोजी वाहनचोरी प्रतिबंधक कारवाईचे अनुषंगाने हडपसर पो.स्टे. हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल सरतापे व विनायक येवले यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लक्ष्मी सोसायटीचे गेट जवळ, जुने कॅनॉलचे लगतचे रोडवर, माळवाडी, हडपसर, पुणे येथे दोन मुले एक काळ्या रंगाचे हिरो स्प्लेंडर गाडीवर संशयित रित्या बसलेली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच सदरची बातमी पथकाचे प्रमुख नंदकुमार गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळविले असता त्यांनी सदर बाबत कारवाई करणे कामी योग्य त्या सूचना दिल्याने सदर ठिकाणी स्टाफच्या मदतीने सापळा रचून सदर संशयित इसमास अत्यंत शिताफीने पकडले व त्यास नाव पत्ता विचारता त्यांनी आपले नाव १)आतिश किसन जाधव,वय१९ वर्ष, रा. चंदवाडी, फुरसुंगी, पुणे २) आदित्य अविनाश खोमणे, वय १९ वर्ष ,रा. पवार आळी, फुरसुंगी ,पुणे असे सांगितले. त्यास सी.आर.पी.सी.४१(ड)प्रमाणे ताब्यात घेऊन दरोङा विरोधी पथकाचे कार्यालयात आणुन अधिक चौकशीत त्याचे ताब्यातील दुचाकी ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले व सदर दुचाकीबाबत हडपसर पो स्टे येथे गु र नं १०१५/२०२३ भादवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजले. त्यांनी आणखी ३ दुचाकी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन जप्त आहे. आरोपीकडून खालील प्रमाणे एकूण ४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
१) हडपसर पो स्टे गु.र.नं.१०१५/२०२३ भादवि क.३७९
२) चतु:र्श्रुंगी पो स्टे गु.र.नं.४९०/२०२३ भादविक.३७९
३) दिघी पो स्टे गु.र.नं. १७९/२०२३ भादविक.३७९
४) लोणी काळभोर पो स्टे गु.र.नं.
४१४/२०२२ भादविक.३७९
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईकामी हडपसर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.रामनाथ पोकळे सर, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. सतीश गोवेकर सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शना खाली सहा पोलीस निरीक्षक विवेक पाडवी व पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश लोखंडे, दिनकर लोखंडे, विनायक रामाने ,अशोक आटोळे, दत्तात्रय खरपुडे, गणेश लोखंडे, सुदेश सपकाळ ,शिवाजी जाधव, अमोल सरतापे, विनायक येवले, संदीप येळे ,राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर यांनी केली आहे.

