- एकल वापर प्लास्टिक बंदी व पर्यावरण संवर्धन मानवता विकासाबाबत चिमुकल्यांनी केली जनजागृती.
- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा अभिनव उपक्रम.
संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
राजुरा:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुराच्या वतीने श्री सोमेश्वर देवस्थान मंदिर परिसरात पर्यावरणपूरक तान्हा पोळा स्पर्धा आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये एकल वापर प्लास्टिक बंदी, पर्यावरण संवर्धन व मानवता विकास बाबत जनजागृती अशा विषयांवर ही नंदीबैल सजावट स्पर्धा घेण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊराव बोबडे, सचिव, सोमेश्वर स्वामी देऊळ देखरेख समिती राजुरा हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून देखरेख समितीचे भाऊराव खाडे, रामचंद्र आदे, बापूजी कुचनकर, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, नगर परिषद शाळांचे केंद्रप्रमुख बंडू ताजने, या स्पर्धेचे परीक्षक म्हणून राजबिंद्र डाहूले, प्रभाकर साळवे, श्रीराम कुईट, नेफडोचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभुळकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संतोष देरकर, वन्यजीव संवर्धन समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप आदे, अनंता येरणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या पर्यावरणपूरक तान्हा पोळा स्पर्धेतील प्रथम क्रमांक हर्षवर्धन रमेश इटणकर, द्वितीय क्रमांक अर्णव नरेंद्र हेपट, तृतीय क्रमांक कु. मुग्धा सचिन मोरे व प्रोत्साहनपर बक्षीस तेज राजू साईनवार, ओम महादेव झाडे यांना प्राप्त झाले. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाचे विशेष आकर्षण अंकुश साईनाथ पोटदुखे हा विध्यार्थी राहिला. याला अनपेक्षितपणे नरेंद्र देशकर, नेफडो चे तालुका संघटक तथा विहीरगाव क्षेत्र सहाय्यक, वनविभाग यांच्यातर्फे लाकडी नंदीबैल भेट देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा कोयचाडे यांनी केले. प्रास्ताविक बादल बेले यांनी तर आभार उमेश लढी यांनी मानले. प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांकाचे सन्मानचिन्ह सुनैना तांबेकर,चंद्रपूर जिल्हा महिला सचिव नेफडो यांच्यातर्फे देण्यात आले. तर प्रोत्साहनपर सन्मानचिन्ह नितीन जयपुरकर यांच्यातर्फे व भेटवस्तू अश्लेषा राजू चेडे आणि प्रमाणपत्र नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे देण्यात आले.
यावेळी सहभागी मुलांना सोमेश्वर देवस्थान देखरेख समिती तर्फे बिस्कीट व चंद्रकांत कुईटे यांच्या तर्फे पेनी, प्रदीप भावे यांच्या तर्फे चॉकलेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सोमेश्वर देवस्थान समितीच्या सर्व पदाधिकारी,सदस्य आणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्य व सोमनाथपूर वार्ड वासीयांनी सहकार्य केले. याच ठिकाणी मोठा बैल पोळा सुद्धा भरला होता. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य अभियान अंतर्गत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेला श्री सोमेश्वर देवस्थान मंदिर हे दत्तक देण्यात आलेले असून या ठिकाणी विविध उपक्रम, सामाजिक कार्य करून नेफडो संस्था आपली सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. नुकतेच चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी हे दत्तक पत्रक या संस्थेला दिले.