✍🏻 विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
नेवासा:- अहमदनगर मधून एक दुर्दैवी घटना समोर येत आहे नगर-संभाजीनगर महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे व दुभाजकावरील गवत काढत असताना डम्परला मागच्या बाजूने कंटेनरने चिरडल्याने दोन मजूर जागीच ठार झाले. या अपघातात चार मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजता वडाळा बहिरोबा गावजवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार, नगर-संभाजीनगर महामार्गा वरील वडाळा बहिरोबा गावाजवळ महामार्गावर काल शनिवारी आठ ते दहा मजूर रोजंदारीवर गवत काढण्याचे व खड्डे बुजविण्याचे काम करीत होते. संभाजीनगरवरून भरगाव नगरकडे जात असलेल्या कंटेनर क्रमांक एम एच 46 बी एफ 9155 हा रस्त्यावर लावलेले बॅरिकेट ओलांडून समोर वेग नियंत्रित न झाल्याने मजुरांना उडवत कामासाठी असलेला टिप्पर क्रमांक एम एच 16 सीसी 3292 जोरदार धडक दिली.
या दुर्घटनेत रमेश भगवान माने वय 50, रा बाभूळखेडा, ऋषिकेश संजय निकम वय 25, रा. सलबतपूर हे दोघे मजूर ठार झाले असून, मेहबूब इब्राहिम शेख, संभाजी आसाराम वायकर, बाळासाहेब रघुनाथ पाटेकर हे जखमी झाले. जखमींना नेवासा रुग्णालयात उपचारासाठी हलवीण्यात आले आहे.