हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. राजुरा येथे अंदाधुंद गोळीबार झाला या गोळीबारात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या पत्नी पूर्वाशा सचिन डोहे वय 27 वर्ष यांचा मृत्यू झाला. याच हल्ल्यात शेजारी राहणारे कोळसा व्यवसायी लल्ली शेरगिल हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.
दिनांक 23 जुलै रविवारला रात्री सचिन डोहे यांच्या पत्नी पूर्वाशा सचिन डोहे यांच्यावर गोळीबार झाला. सचिन यांच्या पत्नीला दोन गोळ्या लागल्या. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. पण डॉक्टरांनी पूर्वशा डोहे यांना मृत घोषित केले. सध्या या घटनेमुळे राजुरा शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ही घटना कोळसा तस्करीतून झाल्याचे सुत्राकडून माहिती मिळत आहे. रात्री उशिरा आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. ही घटना जिल्ह्यातील राजुरा शहरातील सोमनाथपूर वॉर्डात रविवारी रात्री घडली. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीने पुन्हा डोकं वर काढल्याची चर्चा आहे.
मिलेलेल्या माहितीनुसार, राजुरा शहरातील सोमनाथपूर वॉर्डामधील भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरी रविवारी रात्री अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. गोळी लागून सचिन डोहे यांची पत्नी पूर्वाशा सचिन डोहे यांचा मृत्यू झाला तर शेजारी राहत असलेले कोळसा व्यापारी लल्ली शेरगिल हे गंभीर जखमी झाले. गोळीबार झाल्यानंतर काही तासांतच आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.
या गोळीबारात जखमी झालेले लल्ली शेरगिल यांना उपचारासाठी चंद्रपुरात हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने चंद्रपूर जिल्हातील एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत.

