डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पिंपरी, ता.२३:- हा अपराधी काही जन्मताच अपराधी नसतो. तर परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवत असते. मात्र आयुष्यभर गुन्हेगार म्हणून जीवन जगणाऱ्यांना सुधारण्याची एक संधी मिळाली पाहिजे, अशी संधी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विधीसंघर्षित बालकांना उपलब्ध करून दिली आहे. या संधीचे सोने ही मुलं अगदी जीव ओतुन करीत आहेत.
पुणे मॅरेथॉन यांनी रविवार ता.२३ रोजी बालेवाडी येथे धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत राज्यभरातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड येथील दिशा उपक्रम अतर्गत सहा विधी संघर्षित बालकांना या स्पर्धेत सहभागी करण्यात आले होते तसेच निरीक्षक गृहातील ०१ विधी संघर्षीत बालकाने देखील या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अशा बालकांना आपले अंगभूत गुनाद्वारे स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आहे. ही मुले परिस्थितीमुळे कमी वयात, अर्धवट शिक्षण सोडून, वाईट मार्गाचा अवलंब करतात अशी मुले वाईट संगतीमुळे गुन्हेगारीकडे आकर्षित होतात, दिशाहीन होतात अशा भरकटलेल्या मुलांना गुन्हेगारी मार्ग पासून परावृत् करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केले जात आहे. याकरिता विविध स्पर्धांमध्ये त्यांना सहभागी करून घेतले जाते आहे.
या उपक्रमासाठी संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशन व सुषमा कोप्पीकर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. योग्य नियोजन करून तसेच मुलांची जबाबदारी घेऊन या मुलांना या स्पर्धेत सहभागी करून त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. पंडित जवाहरलाल नेहरू औद्योगिक केंद्र निरीक्षण गृहाचे अधिकारी दत्तात्रेय कुटे तसेच संस्थेचे कर्मचारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दिशा उपक्रम राबवीत असलेले विशेष बाल पोलीस पथक आणि ज्यूविनाईल जस्टीस बोर्ड यांची टीम देखील या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले आहे.

