🖋️ विश्वास त्रिभुवन,अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
नगर:- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची निंदनीय घटना रविवारी दुपारी घडली. अकोले पोलिसांनी नराधम आराेपीच्या काही क्षणातच मुसक्या आवळुन गजाआड केले आहे. दिलीप विठ्ठल पवार उर्फ पप्पु असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पिडित ३६ वर्षीय मतिमंद मुलीचे आई वडिल शेतात मजुरीच्या कामाला गेलेले असल्याने घरी एकटीच होती. या परिस्थितीचा फायदा घेत रविवारी दुपारी आरोपी दिलीप विठ्ठल पवार उर्फ पप्पु याने घरात घुसून दरवाजा लावून तिच्यावर बलात्कार केला.
याबाबत पिडितीचे नातेवाईक महिलेने अकोले पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, पिडिता हि ३६ वर्षिय मतिमंद मुलगी असुन तिला बोलता येत नाही. ती जन्मतःच मतिमंद आहे. रविवारी दि.२८ ऑगस्ट दुपारी तिचे आई वडिल शेतात मजुरीच्या कामावर गेलेले असताना घरातून तिचा ओरडण्याचा आवाज येत होता. हा आवाज कसला व कुठून येतोय हे त्या महिलेने पाहण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हा आवाज घरातून येत असल्याचे समजल्यानंतर या नातेवाईक महिलेने मुलाला सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. मुलाला मागील दरवाज्याजवळ पाठवून त्यांनी पुढच्या दरवाजाला जाऊन जोराचा धक्का दिला. दरम्यान दरवाजा उघडल्यानंतर घरात आरोपी दिलीप विठ्ठल पवार उर्फ पप्पु हा पिडित मतिमंद मुलीवर अत्याचार करत असल्याचे दिसून आले. यावेळी त्याला पकडले असता तो माझ्याकडून चूक झाली पुन्हा होणार नाही असे म्हणत हाताला धक्का देवून पळून गेला. पिडिता भयभीत असल्याने तिला उपचारासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.