पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहीती अशी की, एप्रिल २०२२ मध्ये वर्तमान पत्रामध्ये आलेल्या जाहिराती वरील मोबाईल नंबर वर फिर्यादी महिलीने संपर्क साधला असता आरोपी याने फिर्यादी महिलेस विश्वास संपादन करून सांगितले की, मी केलेल्या प्लॉटिंग मध्ये पैसे गुलवा तुम्हाला एका महिन्यात दाम दुपटीने पैसे मिळवून देतो असे सांगितले असता फिर्यादी महिलेने माझेकडे रोख रक्कम नसल्याचे सांगितले असता आरोपी याने फिर्यादी महिलेस विश्वासात घेवून तुमच्या कडील सोन्याचे दागिने मला दया मी त्यावर लोन काढून ते पैसे गुंतवितो असा विश्वास देवुन फिर्यादी महिलेकडुन १९ तोळे सोन्याचे दागिने व रोख ३,५०,०००/- रुपये घेवून आरोपी हा मागील एक वर्षापासून सदरचे पैसे व सोने घेवून स्वतःचे अस्तिव लपवुन फिर्यादी महिलेस गुंगारा देत होता. त्यानंतर फिर्यादी महिलेने सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे येथे संपर्क साधुन पोलीसांना हकिगत सांगुन पोलीसांनी प्राथमीक चौकशी करून त्यानंतर सिंहगडरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २६९/२०२३ भा.द.वि. कलम ४२०, ४०६.३४ प्रमाणे आरोपी नामे आनंद नारायण पावसकर रा. तिरुपतीनगर, वारजेनाका, वारजे पुणे ५८ व प्रथमेश पावसकर याचे विरुद्ध दिनांक १३/०६/२०२३ रोजी वरील प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करीत असताना सदर आरोपीचा तांत्रिक विश्लेषण व गोपनिय बातमीदार मार्फत शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार ८३४२ अमोल पाटील, पोलीस अंमलदार ८६०० देवा चव्हाण, पोलीस अंमलदार १०५१० शेडगे यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, नमुद गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे आनंद नारायण पावसकर रा. तिरुपतीनगर, वारजेनाका, वारजे पुणे ५८ हा मु. पो. डाळींब ता. दौड जिल्हा पुणे याठिकाणी आहे अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने सदर बातमी आम्ही मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो सिहगड रोड पोलीस स्टेशन पुणे यांना कळवून सपोनि सचिन निकम, पोलीस अंमलदार ८३४२ अमोल पाटील, पोलीस अंमलदार ८६०० देवा चव्हाण, पोलीस अंमलदार १०५१० शेडगे, असे मिळाले बातमी प्रमाणे पाहीजे आरोपी नामे आनंद नारायण पावसकर याचा सदर भागामध्ये शोध घेता तो मु.पो. डाळींब, ता. दौड, जिल्हा पुणे या ठिकाणी मिळुन आल्याने त्यास सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे येथे आणुन त्यास दिनांक २२/०७/२०२३ रोजी अटक करुन त्याची दिनांक २७/०७/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी घेतली असता पोलीस कस्टडी घेवून त्याचेकडे अधिक तपास करता नमुद गुन्हयातील फसवणुक करुन नेलेले किंमत रुपये ९,३०,०००/- चे १९ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे. पुढील तपास सपोनि सचिन निकम सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त सो सुहेल शर्मा, सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगडरोड विभाग श्री राजेंद्र गलांडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक आबा उतेकर, पोहवा संजय शिंदे, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास बांदल, विकास पांडुळे, सागर शेडगे, अविनाश कोंडे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, स्वप्नील मगर, दक्ष पाटील, नलीन येरुणकर यांचे पथकाने केली आहे.

