अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- चालू शैक्षणिक क्षेत्रात शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा नियोजनबद्ध व यशस्वी व्हावी याकरिता आर्वी आष्टी व कारंजा या तिन्ही तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची सभा तळेगाव येथे संपन्न झाली. या सभे करिता जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे मॅडम क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे, भोजराज चौधरी, संजय कथळकर, विश्वास बोकडे, राजस्थान रॉयल चे संघ व्यवस्थापक रोमी भिंडर, नीता अढाऊ मॅडम, आर्वीचे क्रीडा संयोजक कपिल ठाकूर, आष्टीचे संयोजक गणेश आजणे सर, कारंजाचे संयोजक मंगेश जाचक सर यांची उपस्थिती होती.
वरील सभेमध्ये रोमी भिंडर हे म्हणाले की, आज तळेगाव येथे मोठमोठे आंतरराष्ट्रीय खेळाडू येत आहे व आज त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये इतकी यशाची शिखरे गाठली याचे संपूर्ण श्रेय मी हायस्कूल विभागामध्ये शिकवणाऱ्या शारीरिक शिक्षकांनाच आहे असे सांगून खेळाचे महत्व विशद केले जिल्हा क्रीडा अधिकारी मॅडम यांनी सुद्धा स्पर्धेसंबंधी सविस्तर माहिती सांगितली खोब्रागडे व भोजराज चौधरी यांनी सुद्धा विचार मांडले व स्पर्धेचे सविस्तर निकष व स्पर्धा व कशा होतील आणि स्पर्धा यशस्वी करण्यामागे सर्व शारीरिक शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो असे मत तालुका क्रीडा संयोजक कपिल ठाकूर यांनी मांडले.
या सभेमध्ये किनी तालुक्यातील शारीरिक शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश जाचक सर यांनी तर आभार गणेश आजने सर यांनी व्यक्त केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

