सागर शिंदे, वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- राज्य शासनाने खासगी पद्धतीने पोलीस भरतीचा जो निर्णय घेतला तो तातडीने मागे घ्यावा, तसेच बॉम्बे होमगार्ड ॲक्ट 1947 मध्ये सुधारणा करून महारष्ट्र होमगार्ड सैनिकांना 365 दिवस नियमित करून न्याय द्यावा या प्रमुख मागणीसह, इतर 17 मागण्यांचे निवेदन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राम पाटील डोरले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मुंबई येथे दिले. अन्यथा आम आदमी पार्टीच्यावतीने मुंबई येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
आम आदमी पार्टीच्यावतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, राज्यात अस्तित्वात असलेला बॉम्बे होमागार्ड ॲक्ट 1947 मध्ये सुधारणा करून महारष्ट्र होमगार्ड सैनिकांना 365 दिवस नियमित करून न्याय द्यावा या प्रमुख मागणीसह, केंद्र सरकारच्या उपसचिवांनी काढलेल्या 17 जानेवारी 1984 चा आदेशाची अंमलबजावणी करून होमगार्डना 365 दिवस नियमित करण्यात यावे, बॉम्बे होमगार्ड ॲक्ट 1947 मधील दर 3 वर्षानी होणाऱ्या पुर्न नोंदणी पुर्न नियुक्ती प्रणाली अथवा पद्धत कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, बॉम्बे होमगार्ड ॲक्ट 1947 मधे बॉम्बे पोलीस ॲक्ट प्रमाणे किंवा प्रादेशिक सेना TA 118 इन्फैंट्री बटालियन या धरतीवर सुधार करण्यात यावा, पोलीस विभाग प्रमाणेच राज्यने दर आर्थिक वर्षी त्यांचा बजट सत्रात होमगार्ड विभाग करिता स्वतंत्र बजट चे व्यवस्था निर्माण करावे तसेच प्रतिवर्ष महागाई दरानुसार होमगार्ड विभागाला महागाई भत्ता उपलब्ध करण्याचे विधान तयार करण्यात यावे, होमगार्ड सैनिकांना कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, होमगार्ड पाल्यांना प्रशासकीय सेवाभरती मध्ये अनुकंपा तत्व प्रणालीने स्थान मिळावे, होमगार्ड सैनिकांची सेवानिवृती वयोमर्यादा किमान 60 वर्षे पर्यंत करण्यात यावी आदी 17 मागण्यांचा या निवेदनाद्वारे राज्यशासनाकडे आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आल्या आहेत. या मागण्या पूर्ण न केल्यास आपच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

