श्री प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी मो. न.8329084432
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागभीड, दि.28 जुलै:- नागभीड तालुका व शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने तहसिल कार्यालयावर केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलनाचे आयोजन केले होते. मणिपूर राज्यात आदिवासी कुकी महिलांची विटंबना करून त्यांच्यावर नराधमांनी अत्याचार केले. सदर महिलांवर होत असलेल्या आत्याचार व हिसांचार २ महिण्यांनंतर कालावधी होऊन सुध्दा नराधमांना अटक करण्यात आलेले नव्हते. अशा अनेक हिसांचाराच्या घटना दररोज मनिपुरमध्ये घडत आहे. देश जळत असताना केंद्र सरकार व राज्य सरकार मुंग गिळून गप्प आहे.
तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी जेंव्हा मणिपूरची वस्तुस्थितीची पाहणी करण्यास गेले तेव्हा त्यांना त्या ठिकाणी घडत असलेल्या हिंसाचार व अत्याचारांबद्दल माहिती होऊ नये म्हणून त्यांना रोड मार्गाने मोटारीने जाण्यास बंदी घालून हेलिकॉप्टरने सरळ निर्वासितांच्या शिबिरात नेण्यात आले. अशी लज्जास्पद घटना घडवण्यात आली असतांना सुद्धा मणिपूरचे मुख्यमंत्री त्याकडे गांभीर्याने बघत नसून अशा शेकडो घटना घडत असतात असे निर्लज्जपणे प्रसार, माध्यमांना सांगतात. देशाचे प्रधानमंत्री सुद्धा या घटनेची तुलना इतर राज्यात घडलेल्या वेगळ्या प्रकारच्या घटनेंशी करतात. देशाचे प्रधानमंत्री व गृहमंत्री यांनी याप्रकरणी तसेच मणिपूर राज्यात घडत असलेल्या हिंसेची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. ही शोकांतिका आहे. त्यामुळे या घटनेसोबतच मणिपूर राज्य सरकार, मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री व प्रधानमंत्र्यांचा निषेध करण्यात आला. मणिपूरचे मुख्यमंत्री व देशाचे प्रधानमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी भारताच्या राष्ट्रपती कडे करण्यात आली.
अशा या घटनेच्या निषेध तहसिल कार्यालयासमोर मनीपूर सरकार व मोदी सरकार विरोधात नारे देवुन तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, नागभीड शहर अध्यक्ष रमेश ठाकरे, तालुका कोषाध्यक्ष रामकृष्णजी देशमुख, सेवादल तालुका अध्यक्ष डाँ. रविंद्र कावळे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष पुरूषोत्तम बगमारे, किशोर समर्थ, रविंद्र बळी, नागभीड तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ मुळे, नागभीड युवक शहर अध्यक्ष महेश कुर्झेकर, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष तबरेज शेख, सरपंच संघटना जिल्हा अध्यक्ष हेमंतभाऊ लांजेवार, सरपंच अमोल बावणकर, अल्पसंख्यांक तळोधी शहर अध्यक्ष वसीम छुकारीया, नागभीड महीला तालुका काँग्रेस अध्यक्षा प्रणया गड्डमवार, चिमुर विधानसभा महिला अध्यक्षा नितु गुरुपुडे, महिला शहर अध्यक्षा सुनिता डोईजड, माजी जि. प. सद्स्या ताईबाई रंधये, माजी पं.स.सभापती रेखा गड्डमवार, शर्मिला रामटेके, सुनिता सेलोकर, निलिमा भुरे, माला मुळे, पुष्पा चौखे, सरपंच शालु हांडेकर, माजी नगरसेवक संजय अमृतकर, वासुदेव मोहुर्ले, मधू बावणकर, हरीष मुळे, संकेत वारजूकर, प्रशांत गेडाम, अनिल माथनकर, पुरूषोत्तम पराते, मनिषा निहिटे, कुंदा देशमुख तसेच तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

