निखिल पिदूरकर कोरपणा तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:- भारतीय जनता महिला मोर्चा उर्जानगर विभागातर्फे स्नेहबंध सभागृहात २८ ऑगस्टला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्ताने महाराष्ट्राचे वने, मत्स व्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मार्गदर्शनाखाली,विभागिय भाजपा नेते रामपाल सिंह यांच्या सहकार्याने शिक्षण क्षेत्रात गुणवंत ठरलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ बल्लारपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय हरिशभय्याजी शर्मा यांचे हस्ते तालुका भाजपाध्यक्ष हनुमान काकडे, जिल्हा परिषदच्या माजी सदस्या वनिताताई आसुटकर यांचे उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी ७५% पेक्षा अधिक गुण मिळवुन यशवंत ठरलेल्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्वाधिक गुण 99.4% एम.ए. हिंदी विषयात मिळविल्या गुणवंत विद्यार्थीनी कु. माधुरी दीपक कटकोजवार हिला खास सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचा प्रारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करून करण्यात आला…या कार्यक्रमाचे संचालन पुर्व विदर्भ विभागीय महिला मोर्चा सोशल मिडिया प्रमुख सौ. लक्ष्मीताई सागर यांनी केले. याच कार्यक्रमा सोबत महिलांना प्रोत्साहन देण्या करीता रांगोळी व पाक कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेचे परीक्षण जिल्हा परिषद माजी सभापती रोशनी खान यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीसरातील महिला कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.