✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी ✒️
इगतपुरी:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इगतपुरी मध्ये भरदिवसा एका घरात चोरट्यांनी हात साफ केला त्यामुळे इगतपुरी शहरात चोरट्यांची हिम्मत वाढली असल्याचे या घटनेवरून दिसून येते आहे, भरदिवसा पाचच्या सुमारास तळेगाव रोडवरील फ्लॅट चोरट्यांनी फोडत रोख रकमेसह सोन्याचे दागिने मिळून 2 लक्ष 77 हजारांचा ऐवज लंपास केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, इगतपुरी शहरातील तळेगाव रोड भागातील वास्तू द्वक्झरीया या बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये दि.26 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चोरट्यांनी बंद असलेला फ्लॅटच्या दरवाजाचे सेफ्टी लॉक व कडीकोयंडा फोडून सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत सोमनाथ फाळके यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोखंडी कपाटाचे लॉक तोडून कपाटाचे तिजोरीतील 20 हजारांची रोख रक्कम, 75 हजार रुपये किमतीच्या 2 सोन्याच्या बांगड्या, २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, ८ ग्रॅम वजनाचे नेकलेस, 75 हजार रुपये किमतीचा सोन्याचा राणीहार, 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन, 43 ग्रॅम वजनाचे सोन्याचा नेकलेस, 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 20हजार रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, 12 हजार रुपये किमतीचे दोन सोन्याचे टॉप्स, 05 ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, 15 हजार रुपये किमतीचे चांदीचा गडवा व पैंजण असे एकूण 2 लक्ष 77 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.