मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यावर नेहमी शासनाकडून अन्याय होत आला आहे. इथल्या रोजगाराच्या संधी असो, खेळाचे मैदान असो, शैक्षणिक क्षेत्र असो, किंव्हा आरोग्य सुविधा असो नेहमी अन्याय होत आहे. त्यामुळे हिंगणघाट तालुक्यातील सत्ताधारी नेत्यांवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. माती गोट्याचा विकास करून तालुक्यातील नागरिकांना भगवान भरोसे सोडून द्यायच हे फार पूर्वी पासून सुरू आहे. याला आता हिंगणघाट तालुक्यातील नागरिक कंटाळले आहे. त्यात हिंगणघाट शहरात एक सुसज्ज असे मेडिकल कॉलेज होणार यासाठी तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते मागील अनेक दिवसापासून उन्ह, वारा, पाऊस झेलून आंदोलने करत आहे.
हिंगणघाट येथे मेडिकल कॉलेज मिळालेच पाहिजे या मागणीसाठी गेल्या 4 महिन्यापासून हिंगणघाट ची जनता संघर्ष करीत आहे आणि वैद्यकीय महाविद्यालयासाठी धरणे आंदोलन सुरू आहे. पण सत्ताधारी नेत्यांनी साधी दखल घेतली नाही. त्यानंरत या आंदोलनाची दखल सर्वच पत्रकारांनी प्रिंट मीडिया, प्रेस मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, ट्रॅडिशनल मीडिया आणि सोशल मीडिया नी घेतली. सर्व स्तरातुन या आंदोलनाची दखल घेतल्यामुळे आणि सत्ताधारी नेत्यांना जबाब विचारल्या जात असल्यामुळे लोकप्रतिनिधीला सुद्धा विधानसभेत हा मुद्दा रेटून धरावा लागला. यासोबतच मुबई येथे दोन दिवसीय धरणे आदोलनातून सर्व पक्षीय नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला.
एकाच वेळी हिंगणघाट मतदार संघाचे आमदार आणि विरोधी पक्ष नेत्यांनी विधान सभेत मुद्दा मांडल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर सभागृहात बोलावे लागले. त्यामुळे हिंगणघाट मध्येच वैदकिय मेडिकल कॉलेज होण्याच्या आशा पल्लवित झाल्या. अर्थात यात सर्वच हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील नागरीकां च मोठ सहकार्य आहे. दूरदृष्टी (Vision) ची जाणीव असणारे लोकं एकत्र आले की मोठा बदल घडून येऊ शकतो. असेच या आंदोलना वरून दिसून येते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

