विक्की डोके भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लाखांदूर येथील जुनिअर महाविद्यालय बंद करण्याच्या उद्देशाने आलेल्या संस्था सचिवास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळून चांगलाच धडा शिकवला आहे. त्यांना मारहाण करण्यात त्यानंतर या सचिवाची धिंड काढण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण भंडारा जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.
अनेक वर्षांपासून सुरळीत सुरू असलेलं ज्युनिअर महाविद्यालय संस्था सचिवानं बंद करण्याच्या उद्देशानं महाविद्यालयात प्रवेश करून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना धमकाविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं संतप्त शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संस्था सचिवांना मारहाण करत मुख्य मार्गानं त्यांची धिंड काढली. यानंतर शेकडो विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करीत संस्था सचिवाला अटक करण्याची मागणी केली. तब्बल सहा तास विद्यार्थ्यांनी हे ठिय्या आंदोलन केल्यानंतर संस्था सचिव आणि शिक्षकांच्या परस्पर विरोधी तक्रार दाखल केली असून यात संस्था सचिवांना अटक केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर इथं हा प्रकार घडला. समर्थ ज्युनियर कॉलेज मागील अनेक वर्षांपासून लाखांदूर इथं सुरू आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून संस्था सचिव हरिश्चंद्र सुखदेवे आणि शिक्षक यांच्यात अंतर्गत वाद सुरू असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. असं असताना शुक्रवारला दुपारी संस्था सचिव सुखदेवे हे महाविद्यालयात दाखल झाले आणि त्यांनी शिक्षकांसह विद्यार्थ्यांना दमदाटी करून महाविद्यालय बंद करण्याची तंबी दिली. यातून वाद उद्भवल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संस्था सचिव सुखदेवे यांना मारहाण करीत त्यांची लाखांदूर शहरातील मुख्य मार्गानं धिंड काढली.
समर्थ ज्युनियर कॉलेज या संस्थेचे सचिव महाविद्यालय बंद पाडत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे संस्था सचिव विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार असल्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आता निर्माण झाली आहे. याप्रकरणी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सुमारे शंभरावर विद्यार्थ्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत सुमारे सहा तासापेक्षा अधिक तासांचा ठिय्या देत संस्था सचिवावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केली. याप्रकरणी संस्था सचिव आणि शिक्षक यांनी परस्परांविरुद्ध तक्रारी दिल्यानं गुन्हे दाखल केले असून संस्था सचिवाला अटक करण्यात आली आहे. शिक्षण देणाऱ्या संस्थेत झालेल्या या प्रकारानं शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. महाविद्यालय बंद पडू देणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली असून पुढे काय होते याकडं आता सर्वांच्या नजरा लागल्या आहे.