हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- येथील विद्यार्थांनी परत एकदा बल्लारपूरचे नाव उंचवल आहे. बल्लारपूर तालुक्यातील कराटे पटटूचा इन्टरनेशनल कराटे टूर्नामेंटसाठी निवड झाली आहे. त्यामुळे सर्वत्र निवड झालेल्या कराटे पटटूवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नुकत्याच झालेल्या पंजाब अमृसर खालसा कोलेज येथे झालेल्या आल इंडिया कराटे टूर्नामेंट मधे जिंकून ते आता कर्नाटक शिवमोगा येथे होणाऱ्या इन्टरनेशनल कराटे टूर्नामेंट मधे भाग घेणार आहे.
कर्नाटक राज्यातील शिवमोगा येथे इन्टरनेशनल कराटे टूर्नामेंट चे आयोजन करण्यात येत आहे. यात दिलासाग्रा स्कूलचे यश भय्यालाल कोरे, भास्कर संजय गुघलोथ, जी.एन.पी.एस कॉलेजचे विध्यार्थी साईप्रनित स्वामी डोडापल्लीवार व (कोच) सुनिल विजय कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. या इन्टरनेशनल कराटे टूर्नामेंट मधे एकूण 14 देशाची खेळाडू सहभागी होणार आहे.
शहरातील या खेळाडूंची इन्टरनेशनल कराटे टूर्नामेंट साठी निवड झाल्याबद्दल नालंदा क्रिडा मंडळ व शहरी विकास केंद्र बल्लारपूर उपक्रम संस्कार व्यायाम शाळाचे अध्यक्ष समीर केने, मनीष पान्डे व दिलासाग्र स्कूलचे प्रिन्सिपल सिस्टर विणया, व्हाईस प्रिन्सिपल सिस्टर फुल कुमारी व विध्यार्थ्याचे आई वडिल व कराटे प्रशिक्षक (कोच) सुनिल विजय कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या.