🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी 🖊️
वर्धा:- जिल्हात महिला अत्याचाराच्या घटनेट मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे मागील अनेक घटनामधून समोर येत आहे. वर्धा येथील शांतीनगर परिसरातून अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. शांतीनगर येथील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलगी कुटुंबियांसह घरी हजर असताना आरोपी अंकुश अमरसिंग जाखर वय 22 वर्ष रा. शांतीनगर याने अनाधिकृतपणे मुलीच्या घरात प्रवेश केला. मुलीच्या आई वडिलांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला असता, मात्र, त्याने न जुमनाता थेट मुलीच्या आई वडिलांना माझे तुमच्या मुलीवर प्रेम आहे, तुम्ही मला तुमची मुलगी देत नाही, असे म्हणत त्यांच्या समोरच मुलीचा हात पकडून बळजबरीने मुलीला दुचाकीवर बसवून घेऊन गेला.
मुलीच्या आई वडिलांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी अंकुशने धक्काबुक्की केली. अखेर मुलीच्या वडिलांनी याबाबतची तक्रार रामनगर पोलिसात दिली.
तक्रार प्राप्त होतात पोलिसांनी तपास चक्र फिरवलं आणि तत्काळ आरोपी अंकुश जाखर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपी अंकुश जाखर याला अटक करून कोठडीत पाठविले.
काय झालं घटना…
आरोपी अंकुश अमरसिंग जाखर याच या अल्पवयीन मुलीवर प्रेम जळल होते. त्यामुळे त्याने हे कृत्य केले.