रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना वतीने मणिपूर येथून मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेबदल जालना जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मणिपूर येथे घडलेल्या अतिशय निंदनीय घटना दोन महिलांची नग्न धिंड समाज कंटक औलादीच्या भडव्यांकडून काढण्यात आली तरी सुद्धा हे जातीयवादी दंगली खोर भाजप सेना राष्ट्रवादी सरकार मूग गिळून गप्प आहे. आज दोन महिन्यापासून मणिपूर राज्य जळत आहे. नरसंहार लेकी बाळींची अब्रू घेतल्या जात आहे. मैतई या जातींना पूर्ण संरक्षण देऊन दंगल सुरू ठेवण्याचे कार्य भाजप सरकार करीत आहेत. हेच या घटनेवरून निदर्शनास येत आहे.
बेटी बचाव… बेटी पढाव.. चा ढोल वाजविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशवाऱ्या करण्यात मशगुल होते मणिपूरमध्ये वेळीच लक्ष घातले असते तर देशाला लज्जास्पद आणि लांच्छनास्पद घटना घडली नसती. या कुकी महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचाराने आम्ही वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अत्यंत संतप्त झालो आहोत. भाजपाचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह, अमित शहा यांचा राजीनामा ताबोडतोब घेण्यात यावा व आरोपींना शिक्षा द्यावी. तसेच, आमच्या मते ही दंगल सरकार पुरस्कृत आहे. मणिपूर मधील कुकी या आदिवासी जमातीच्या महिलांवर झालेला अत्याचार हा अतिशय निंदनीय आहे. या अमानवीय कृत्याच्या विरोधात जालना जिल्ह्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा रमाताई होर्शीळ यांच्या नेतृत्वात जालना जिल्हा निरीक्षक जितेंद्र सिरसाठ मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके जिल्हा अध्यक्ष डेव्हीड घुमारे महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सविताताई मुंढे यांच्या उपस्थितीत तीव्र निदर्शने करण्यात आले तसेच निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

