मुख्यमार्गदर्शक म्हणून प्रभारी पोलीस अधिकारी साहेबराव कसबेवाड यांची उपस्थिती
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजाराम/ अहेरी:- उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अहेरी अंतर्गत येत असलेल्या उप पोलिस स्टेशन राजाराम च्या वतीने पोलीस अधीक्षक निलोत्पल,चिंता सा.अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन,तारे अप्पर पोलीस अधीक्षक अभियान,देशमुखअप्पर पोलीस अधीक्षक अहेरी यांच्या संकल्पनेतूनसुदर्शन राठोड उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी अधिकारी साहेबराव कासबेवाड यांच्या नेतृत्वाखाली भव्य जनजागरण व कृषी मेळावा आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २७ जुलै रोजी घेण्यात आले होते.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. अस्मिता देवगडे उपजिल्हा रुग्णालय अहेरी, तर मुख्यमार्गदर्शक म्हणून प्रभारी अधिकारी साहेबराव कसबेवाड हे होते प्रमुख अतिथी म्हणून खुणे मॅडम डाक विभाग, चव्हाण अहेरी तालुका कृषी पर्यवेक्षक, मार्गदर्शक म्हणून पोउनि. चौधरी, पोउनि जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून नागेश शिरलावार, अनिल पेंदाम, मुत्ता पोरतेठ, लक्ष्मण झाडे, रघु मडावी, पत्रकार सुरेश मोतकुरवार, उमेश आलाम, नितीन धकाते आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या प्रसंगी दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनेची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन साहेबराव कासबेवाड यांनी केले. कृषी अधिकारी चव्हाण यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकासात्मक शेती कसे करावे व योजने बद्दल माहिती दिले. डॉ. देवगडे यांनी सद्या सुरु असलेल्या पावसाळा हंगामात राहणीमान, सकस आहार, स्वछता आणि संसर्गजन्य रोग आणि उपचार बाबत तसेच आरोग्य बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले .खुणे यांनी डाक विभागाचे योजने व सवलती आणि मुली करिता सुकन्या समृद्धी योजना तसेच इतर माहिती दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोउनि जाधव तर संचालन व आभार पोउनि सचिन चौधरी यांनी मानले
यावेळी गरजू व गरीब शेतकऱ्यांना १५ कृषी फवारणी पंप,०६ दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल,१५० नागरिकांना बियाणे,३० नागरिकांना छत्र्या,१०० फळ रोपटे,२० घमेले,२० पावडे,२० शाळकरी विद्यार्थ्यांना पेन व बुक वितरण करण्यात आले आणि उपस्थित नागरिकांना ५० आभा कार्ड,२० सातबारा,१० पीएम किसान योजना,५० दुय्यम आधार कार्ड काढून देण्यात आले.त्या प्रसंगी राजाराम पोलीस हद्दीतील युवक-युवती आणि शाळकरी बालक मोठया संख्येने उपस्थित होते.व जेवण देऊन सांगता करण्यात आले आहेत. राजाराम पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

