संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
चंद्रपूर:- जिल्हात क्राईमचा ग्राफ मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. भद्रावती येथील पिपरबोडी वस्तीत नृत्य वर्ग चालविणाऱ्या शिक्षकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे ही घटना दि. 28 ऑगस्ट रविवारला सायंकाळच्या सुमारास घडली. सूरज शंकर शेट्टी वय 30 वर्ष असे हत्या झालेल्या नृत शिक्षकाचे नाव आहे. हत्या नंतर संशयीत असलेला आरोपी फरार झाला आहे. या घटनेने भद्रावती शहर चांगलेच हादरले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, भद्रावती शहराला लागूनच असलेल्या पिपरबोडी वस्तीत सूरज शंकर शेट्टी हा नृत्याचे वर्ग घेणारा तरुण आपल्या परीवाराबरोबर राहत होता. शहरातील जुन्या मच्छी मार्केटजवळ तो नृत्य वर्ग चालवायचा. यासोबतच तो मजुरीचीही कामे करायचा. रविवार सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सूरजवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना लोकांना माहीत होताच दोन व्यक्तींनी त्याला स्कुटीवर बसवून येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. मृत तरूणाच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
हत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. घटनेनंतर संशयीत आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.