शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण समितीच्या वतीने आमदार कुणावार यांचा सत्कार
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयाचे चारशे खाटाचे श्रेणी वर्धन करून वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीचा पाया रचला आहे. आता हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणार आहे. ही बाब हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी अनुकूल असून महाविद्यालयाची निर्मिती हिंगणघाट येथेच व्हावी याकरिता संपूर्ण ताकतीनिशी प्रयत्नशील असून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे असे मनोगत आमदार समीर कुणावर यांनी व्यक्त केले.
मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान आमदार कुणावार यांनी हिंगणघाट येथील वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीचा मुद्दा जोरकस पणे व प्रभावीरीत्या मांडला. याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण समिती हिंगणघाट चे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा, शिखरचंद मुनोत, माजी नगरसेवक प्रा. किरण वैद्य, संघर्ष समितीचे सचिव रुपेश राजुरकर, मुख्याध्यापक राजेंद्र सातपुते, प्रवीण कडू आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार समीर कुणावर म्हणाले की आरोग्य सुविधेचा लाभ हा तळागाळातील जनतेला मिळायला पाहिजे. याकरिता सुसज्ज अशा प्रकारच्या रुग्णालयाची गरज आहे. ४०० खाटाचे श्रेणी वर्धन झाल्याने आता मोठ्या प्रमाणात हिंगणघाट तालुक्यात वैद्यकीय सुविधा मिळणार आहे. हिंगणघाट येथेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती होईल असा विश्वास त्यांनी सरतेशेवटी प्रकट केला. तत्पूर्वी माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा यांनी आमदार कुणावार यांनी वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीचा मुद्दा सभागृहात मांडून हिंगणघाट वासीयांच्या अशा पल्लवीत केल्या आहेत असे मनोगत व्यक्त करून भविष्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती हिंगणघाट येथेच होईल असा आशावाद त्यांनी प्रगट केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकासह संचालन रवींद्र गोडे यांनी केले. यावेळी उपस्थितांचे आभार हर्षल गुंडे यांनी मांडले. या सत्कार कार्यक्रमाला अतुल बडमलवार, उमेश गौर, मंगेश चौरे, निखिल ढुमणे, मनीषा राठोड, प्रीती पुडके, अश्विनी वाट, राणी झाडे, किरण भोयर, शशिकांत खुरसंगे, विवेक बुरीले, प्रशांत बोरकर, विक्रम वानखेडे, दीपक चौधरी, रवींद्र मुक्कावार, वाट, अनिल बाळबुदे अमित म्हैसेकर, रीता चनेकार आदींची उपस्थिती होती.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348