वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पूणे:- येरवडा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भिमराव असे समस्त भारतीयांना आपल्या प्रभावी लेखणीतून सांगणारे, तसेच शोषितांचा आक्रोश शब्दांतून मांडणारे थोर समाजसुधारक, लेखक, कवी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येरवडा भीमा शंकर कॉलनी येथे मनसेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष लक्ष्मण नामदेव काटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळेस नेत्र शिबिर, लहान मूलांनसाठी चित्रकला स्पर्धा, आरोग्य शिबीर, तसेच कचरा वेचणाऱ्या महिलांसाठी साड्या वाटप असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी सेवा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अन्न दान करण्यात आले. कार्यक्रमास विभाग अध्यक्ष सूनिल एकनाथ कदम, उपविभाग अध्यक्ष प्रवीण मिसाळ, तसेच मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

