पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ गुन्हे शाखा पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- अंमली पदार्थ विरोधी पथक २ कडुन राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत पथकाकडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक कडील अधिकारी व अमलदार हे विमानतळ पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक ३१/०७/२०२३ रोजी पेट्रोलींग करीत असताना पो.शि. मांढरे यांना मिळालेल्या माहिती वरून पोरवाल रोड येथील एस.बी.आय बैंक जवळील, आयजीधान कोऑपरेटीव्ह सोसायटी चे गेट समोर, लोहगाव, पुणे येथे इसम नामे राहुलकुमार भुरालालजी साहु वय ३२ वर्षे मु.पो. मंगलवाडा तहसिल दुंगला, जिल्हा चितोडगड, राज्य राजस्थान याच्या ताब्यात १,१०,३८,०००/- रू. कि चा ५ किलो ५१९ ग्रॅम अफिम हा अंगली पदार्थ जप्त करून त्याचे
विरुध्द विमानतळ पो.स्टे. येथे गु.र.नं. ४०२ / २०२३. एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क) १७ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.तसेच मागील तीन दिवसात देखील अंमली पदार्थ विरोधी पथक २ यांनी दि.२८/०७/२०२३ रोजी २१/१५ वा पो.शि. मांढरे यांना मिळालेल्या माहिती वरून हडपसर फुरी येथे सापळा रचला असता बदारके यांचे गोडाऊन जवळ, गंगानगर रोड, फुरसुंगी, पुणे येथील सार्वजनिक रोडवर सर्वजनिक ठिकाणी इसम नामे मोहनलाल मेगाराम विश्नोई, वय २४ वर्षे रा पोस्ट मंगरापुरा, बारूडी, तहसिल गुडामालानी जिल्हा बाडनेर राज्य राजस्थान याच्या ताब्यात ६०,००,०००/- रू. कि.चा ३ किलो २९ ग्रॅम अफिम हा अंमली पदार्थ जप्त करून त्याचे विरुध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
तसेच दि.२८/०७/२०२३ रोजी १० / ३० वा येरवडा पुणे येथील स्माशानभुमी जवळ असलेले श्री बालाजी सुगंधालय येथे सार्वजनिक फुटपाथवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे सोनु साहेबराव कोळसे, वय ४४ वर्षे, रा. सुभाष कॉलनी, पोस्ट ऑफिस मागे, वॉर्ड नं. ६, शेळके हॉस्पीटल जवळ श्रीरामपुर याच्या ताब्यात एकुण २,०९, २००/- रु. कि.चा ऐवज त्यामध्ये १,९८,७००/- रू कि चा ९ किलो ९३५ ग्रॅम गांजा है अंमली पदार्थ, १०,०००/- रू कि चा एक ओप्पो कंपीनीचा मोबाईल व ५००/- रू कि ची एक प्रवासी हॅन्डबॅग असा ऐवज व अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. सतीष गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके, पोलीस उपनिरीक्षक दिंगबर चव्हाण, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले, संतोष देशपांडे, प्रशांत बोमादडी, संदिप जाधव, रविन्द्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, संदिप शेळके, महेश साळुंखे, साहिल मन्त्र, नितीन जगदाळे, आझीम शेख, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड व महिला पोलीस अमलदार दिशा खेवलकर यानी केली आहे…

