✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. देवळी येथील लाचखोर नायब तहसीलदार यांना 3 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळात सापडला आहे.
देवळी येथे नायब तहसिदार पदावर कार्यरत असलेले किशोर शेंडे यानी तालुक्यातील शेतकरी याच्या आपसी हीसे वाटप करण्या प्रकरणात कागदपत्रा मध्ये काही तुटी असल्याचे कारण पुढे करून 3 हजार रुपयाची मागणी करण्यात आली.
या लाचखोर अधिकाऱ्याचा कामचुकार पणामुळे शेतकऱ्याचे हिस्से वाटप करण्यात उशीर होत होता. त्यामुळे या शेतकऱ्याला नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. अखेर त्रस्त झाल्यामुळे पिढीत शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक उप अधीक्षक अभय आष्टेकर यांच्या कडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा करून नायब तहसीलदार याला सापळा रचून 3 हजार रुपये ची लाच घेताना रंगेहात लाच लुचपत प्रतिबंधक अधिकारी यांनी केली अटक केली.
ही पूर्ण कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक उप अधीक्षक अभय आष्टेकर, पो. नि. संतोष मुळक, संतोष बावनकुळे, कैलास वालदे, प्रितम ईगळे, निलेश महाजन, प्रशांत मानमोडे यांनी कारवाई करत नायाब तहसीलदार यांना अटक केली.

