मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
हिंगणघाट:- ज्या नगर पालिका म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे काम आहे शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून देणं पण त्याच नगर पालिकेच्या आशीर्वादाने शहरातील फुटपाथ वरील गरीब छोट्या व्यावसायिकांना लूट करण्यात येत असल्याची संतापजनक माहिती हिंगणघाट शहरातून समोर येत आहे.
जेव्हा स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या आशीर्वादानेच स्थानिक गरीब फुटपाथ वरील व्यावसायिकाची लूट करण्यात येत असेल तर दाद मागायची कुणाला असे उदगार गरीब व्यावसायिकांनी महाराष्ट्र संदेश न्युज जवळ व्यक्त केले आहे.
14 डिसेंबर 2020 ला हिंगणघाट नगर पालिकेच्या सर्व साधारण सभेत शहरातील फुटपाथ वरील व्यावसायिक कर वसुलीचा ठेका एका व्यक्तीला देण्यात आला. त्यावेळी घेण्यात आलेल्या ठरावात कोणत्या व्यावसायिकांकडून किती कर घायचा हे नगर पालिकेने ठरवून दिले होते. पण नगर पालिका प्रशासनाने ठरवून दिलेल्या अटी आणि नियम या ठेकेदाराने पायाखाली तुडवत नियमाच्या बाहेर जाऊन फुटपाथ वरील गरीब छोट्या व्यावसायिकाची लूट सुरू केली.
शनिवार दि. 27 ऑगस्ट ला हिंगणघाट येथील कारंजा चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या तान्हा नंदी पोळात शहरातील फुटपाथ वरील व्यावसायिकानी खीलोने, फुगे आणि छोटे छोटे अनेक दुकाने लावली होती. त्यावेळी हिंगणघाट नगर पालिका तर्फे कर वसुलीचा ठेका दिलेल्या ठेकेदाराने अवैध प्रमाणात आपले उखळ पांढरे करून वसुली केली. काही लोकांनी विरोध केला तर दुकान फेकून देऊ अशी भाषा वापरण्यात आली. त्यामुळे या ठेकेदारा विरुध्द आणि नगर पालिका प्रशासनावर या फुटपाथ वरील छोट्या व्यवसायिकांनी संताप व्यक्त केला.
या वेळी छोट्या व्यावसायिका कडून या ठेकेदाराने 15 रुपयाच्या ऐवजी 30 आणि 50 रुपये घेतले. आणि हिंगणघाट नगर पालिका आणि ठेकेदार यामध्ये झालेला करार व नगर पालिकेच्या झालेल्या सर्व साधारण सभेत झालेल्या ठरावाला पायाखाली तुडवत नियमाच्या बाहेर जाऊन वसुली केली. आता नगर पालिका प्रशासन या अवैध वसुली करणाऱ्या ठेकेदारावर काय कारवाई करते याकडे शहरातील फुटपाथ दुकानदाराचे लक्ष लागले आहे.