✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.3:- महसूल साप्ताहानिमित्य महसूल व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने विकास भवन, वर्धा येथे युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकास व स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी, तज्ञ म्हणून अभय दांडेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. या युवा संवाद कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले.
यावेळी स्पर्धा परीक्षा किंवा अन्य विषयांचे अध्ययन करताना येणाऱ्या अडचणींबाबत विद्यार्थ्यांनी तज्ञांना प्रश्न विचारले आणि तज्ञांनी त्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास कसा करावा. अभ्यासाचे नियोजन कसे असावे. कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे, यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

