श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील जिल्हा रुग्णालयातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांनी रुग्णालयाचा कायापालट करत गोरगरिबांना जिल्हा रुग्णालयात चांगले उपचार मिळावेत यासाठी दिवस रात्र काम केले, असे डाॅ. सुरेश साबळे यांचे आज ता.03 मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांना निलंबन करण्यात आलं. मुळात ज्या भरतीमध्ये डॉक्टर सुरेश साबळे यांचा काडीमात्र संबंध नसताना, त्या गैरकारभारामध्ये डॉक्टर सुरेश साबळे यांना अडकवण्याचा हा प्रयत्न असून या कारवाईच्या विरोधात बीड जिल्हात तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव या ठिकाणी झालेल्या भरती मध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचा प्रश्न आज अधिवेशनामध्ये आ. पडळकर यांनी मांडल्यानंतर याची सखोल चौकशी करून नंतर कारवाई करण अपेक्षित होतं, परंतु याची कोणती चौकशी न करता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तडका फडकी डॉक्टर सुरेश साबळे यांच्या निलंबनाची घोषणा केली. विशेष म्हणजे लोखंडी सावरगाव या ठिकाणी झालेल्या भरती घोटाळ्या मध्ये डॉक्टर सुरेश साबळे यांचा काडीमात्र ही संबंध नाही. विशेष म्हणजे ही भरती एका कंपनीने केली असून सर्व प्रक्रिया याच कंपनीने राबवली आहे. यामुळे यात जर गैरप्रकार झाला असेल तर या कंपनी विरोधात गुन्हे नोंद करणे अपेक्षित असताना सुद्धा नेत्यांचा गैर कारभार अधिकाऱ्यांच्या माथी मारल्यासारखं आजची ही कारवाई आहे. यामुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेली घोषणा त्यांनी वापस घ्यावी व जिल्हा रुग्णालयाला डॉक्टर सुरेश साबळे सारखा अधिकारी कायम ठेवावा अशी मागणी होत आहे.
राजकीय नेत्याने घेतला प्रामाणिक अधिकाऱ्याचा बळी. डॉक्टर सुरेश साबळे यांना निलंबित करण्यात आल्यामुळे बीड येथील विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहे. यावेळी अनेक नागरिकांनी राजकीय नेत्याने घेतला प्रामाणिक अधिकाऱ्याचा बळी अशी चर्चा संपूर्ण बीड मध्ये रंगली आहे.