आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- शहरात एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. येथे गटात जोरदार जोरदार राडा झाला त्यानंतर शिवीगाळ करत दोन्ही गटांतील सदस्यांत एकमेकांना मारहाण केल्याची ही घटना रामनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या इंदिरानगर परिसरात घडली.
इंदिरानगर परिसरात घरासमोर सुरू असलेल्या बांधकामाच्या कारणातून दोन गटात जोरदार राडा झाला. हे दोन्ही गट समोरा-समोर येऊन शिवीगाळ करत होते. त्यानंतर काही वेळातच दोन्ही गटांतील सदस्यांत तुंबळ हाणामारी करण्यात आली. या प्रकरणी रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन्ही गटांतील 11 लोकांना अटक केली आहे.
याप्रकरणी रोशन चंद्रमणी नाईक याने रामनगर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, तो त्याचे वडील रात्रीच्या सुमारास घरी असताना पंचफुला भोयर व तिची दोन मुले घराच्या समोरील विटा-सिमेंटने भिंतीचे बांधकाम करीत होते. त्यांना बांधकाम करण्यास मनाई केली असता पंचफुला भोयर, शोभा कुमरे व निखील भोयर यांनी वाद करून शिवीगाळ केली. निखील भाेयर याने फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. तसेच त्याचे वडील, भावासह इतरांनाही मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी निखील भोयर, आकाश भोयर, प्रकाश कुंबरे, पंचफुला भोयर, शोभा कुंबरे यांना अटक केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

