युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन नागपुर:- राज्य शासनाकडून घेण्यात आलेल्या विविध निर्णयां विरुद्ध पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. या अन्याय निवारण समीतीच्या अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी आंदोलनकारी विद्यार्थ्यांची भेट घेऊन संबंधित विषयासंदर्भात पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या मागण्या त्वरीत मंजूर करावेत अशी विनंती केली.
काय आहे हे राज्य व्यापी आंदोलन..
डिप्लोमा अँड वेटनरी सायन्स हे नाव बदलून नर्सिंग इन ॲनिमल हेल्थ केअर असे नाव करावे, पॅरामेडिकल अॅन्ड मेडिकल ज्याप्रमाणे वेगळे आहे, त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय आणि नर्सिंग हेदेखील वेगळे करावे, या मुख्य मागणीसाठी ६ पशुवैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांनी बेमुदत आंदोलन पुकारले आहे. डिप्लोमा अँड वेटनरी सायन्स हे नाव बदलून नर्सिंग इन ॲनिमल हेल्थ केअर असे नाव करावे, आयव्हीसी कायद्याचे पालन आणि परवानाधारक वैद्यकाच्या अखत्यारित या डिप्लोमाधारक डॉक्टरांनी काम करावे, अशा विविध मागण्यांसाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थाकडून हे आंदोलन करण्यात येत आहे.
डॉक्टरांनी पुकारला संप…
दिनांक 4 ऑगस्ट शुक्रवार हा आंदोलनाचा 10 दिवस असून आज सकाळ पासूनच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा परिसर घोषणाबाजी करत दणाणून सोडला. या डॉक्टरांनी संप पुकारला असून सध्या ओपीडी व्यवस्था बंद असून राज्यभरातील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील व संलग्न असलेल्या ठिकाणी ओपीडी विभाग बंद ठेवण्यात आली आहे.
काय आहे मागण्या..
राज्यात एकूण सहा पशुवैद्यकीय महाविद्यालये आहेत, त्यात राज्य शासनाने खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सध्या अस्तित्वात असणाऱ्या महाविद्यालयांची दूरवस्था पाहून महाविद्यालयांची सुधारणा करावी आणि खासगी रुग्णालये बांधण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. तसेच, सध्याचा डिप्लोमा कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांनी परवानाधारक वैद्यकाच्या अखत्यारितेत प्रॅक्टिस करावी, असा आयव्हीसी कायद्याचा नियम असून यांची अंमलबजावणी करावी. पण, याची अंमलबजावणी होत नसून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

