✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुदपुर:- पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हवा, अरविंद येनुरकर यांना मुखबिरा मार्फत माहिती मिळाली की, नंदोरी येते एका घरात कल्याण ओपन वरली वर मोबाईल फोनद्वारे अवैधरित्या सट्टा पट्टी जुगार आकडे घेत आहे. या माहिती वरून समुद्रपूर पोलिसांनी छापा टाकून आरोपीला बेड्या ठोकल्या.
डि.बी. पथकाचे पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, पो.ना.राजेंश शेंडे, पो.शि. वैभव चरडे यांनी दोन पंचासह यातील नमुद आरोपीवर शेख सत्तार शेख रझ्झाक वय 62 वर्ष, रा. गांधी वार्ड क्र 02 नंदोरी त्याचे राहते घरी छापा मारला असता, आरोपी हा मोक्कावर रंगेहाथ कल्याण ओपन वरली वर मोबाईल फोनद्वारे सट्टा पट्टीचे आकडे घेतांना मिळून आल्याने, त्यास पंचासमक्ष ताब्यात घेवून, कायदेशीर रित्या त्यांची अंगझडती घेतली असता, झडती दरम्यान वरील नमुद वर्णनाचा जु.किं. 48,860 रू चा मुद्देमाल मिळून आला असून, त्याचे जवळून मिळालेली रक्कम हि जुगाराची असल्याचे व लोकांकडून सट्टापट्टीचे आकडे घेण्याकरीता मोबाईलचा वापर केल्याचे निष्पन्न झाल्याने, जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदरचा माल जप्त केला. यावेळी जप्त मुद्देमाल व आरोपीस ताब्यात घेवून आरोपीविरूध्द समुद्रपूर पोलिस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार सपोनि एस.बी.शेगांवकर यांचे निर्देशाप्रमाणे, स.फौ. विक्की मस्के, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.शि. वैभव चरडे यांनी केली.

